England Beat Australia: इंग्लंडने तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून केला पराभव, मालिकेत अजूनही 2-1 ने पिछाडीवर

इंग्लंडने तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव करत शानदार पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. 251 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 50 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले.

अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात सामना झाला. दोन्ही संघांमधील हा सामना हेडिंग्लेच्या मैदानावर झाला. इंग्लंडने तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव करत शानदार पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. 251 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 50 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. याआधी तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा आणि दुसऱ्या डावात 224 धावा केल्या होत्या. इंग्लंडने पहिल्या डावात 237 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 26 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने पहिल्या डावात सर्वाधिक 80 धावा केल्या. जॅक क्रॉलीने 33, मार्क वुडने 24 आणि मोईन अलीने 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement