ENG vs PAK, Women's World Cup 2022: इंग्लंड गोलंदाजांचा दबदबा, पाकिस्तान महिला संघ अवघ्या 105 धावांत ऑलआऊट
कॅथरीन ब्रंट आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर पाकिस्तानसाठी सिद्रा आमीन हिने 32 धावांची सर्वाधिक खेळी केली. अशा परिस्थितीत आता इंग्लंड महिला विश्वचषकात एका मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
ICC Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकच्या आपल्या ‘करो या मरो’च्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) 105 धावांवर बाद करून इंग्लंडने (England) नाणेफेक जिंकून बॉलने वर्चस्व गाजवले. कॅथरीन ब्रंट (Kathrine Brunt) आणि सोफी एक्लेस्टोनने (Sophie Ecclestone) प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर पाकिस्तानसाठी सिद्रा आमीन (Sidra Ameen) हिने 32 धावांची सर्वाधिक खेळी केली. अशा परिस्थितीत आता इंग्लंड महिला (England Women) विश्वचषकात एका मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. महिला विश्वचषकात पाकिस्तान संघाचे सेमीफायनलचे आव्हान संपुष्टात आले आहे, तर गतविजेता इंग्लंडला अंतिम चारमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आता शिल्लक दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)