Devon Conway Catch Video: बिबट्यासारखी दाखवली चपळता, उडी मारत डेव्हन कॉनवेने घेतला अप्रतिम झेल, सरफराज खान राहिला बघत

मॅट हेन्री न्यूझीलंडसाठी 10 वे षटक टाकण्यासाठी आला. हेन्रीच्या चौथ्या चेंडूवर सरफराज मोठा शॉट खेळणार होता. पण चेंडू त्याच्या बॅटला नीट लागला नाही आणि थेट कॉनवेच्या हातात गेला.

Devon Conway Catch (Photo Credit - X)

IND vs NZ 1st Test Day 2: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पहिली कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरला. मात्र भारताची सुरुवात आतापर्यंत चांगली झाली नाही. त्यानी सलग 3 विकेट गमावल्या. प्रथम रोहित शर्मा नंतर विराट कोहली आणि नंतर सरफराज खानने आपली विकेट गमावली. भारताने 10 षटकात 3 गडी गमावून केवळ 12 धावा केल्या. सरफराजला खानला डेव्हन कॉनवेने झेलबाद केले. खरंतर विराट कोहलीनंतर सरफराज खान फलंदाजीसाठी मैदानात आला. मॅट हेन्री न्यूझीलंडसाठी 10 वे षटक टाकण्यासाठी आला. हेन्रीच्या चौथ्या चेंडूवर सरफराज मोठा शॉट खेळणार होता. पण चेंडू त्याच्या बॅटला नीट लागला नाही आणि थेट कॉनवेच्या हातात गेला. कॉनवेने कोणतीही चूक केली नाही. त्याने केवळ एका हाताने अप्रतिम झेल घेतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement