DC vs SRH Free Live Streaming Online: आजच्या सामन्यात दिल्ली भिडणार हैदराबाद सोबत, घरबसल्या कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून

आजच्या सामन्यात दोन्ही संघ आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील.

SRH vs DC (Photo Credit - Twitte)

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी या मोसमात 7-7 सामने खेळले आहेत आणि दोन्ही संघ 5-5 सामने गमावून गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानांवर आहेत. आजच्या सामन्यात दोन्ही संघ आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतील. दरम्यान, हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होईल. याशिवाय लाइव्ह स्ट्रिमिंगबद्दल सांगायचे तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर तुम्ही हा सामना थेट पाहू शकता. तुम्ही OTT वर Jio Cinema द्वारे हिंदी, इंग्रजी, तेलगू, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये सामन्याचा आनंद घेऊ शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)