DC vs MI, IPL 2024 Live Score Update: दिल्लीने मुंबईला दिले 258 धावांचे लक्ष्य, मॅकगर्कची वादळी खेळी तर स्टब्सही चमकला
दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स संघ 4 सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने 3 सामने जिंकले असून संघ 8व्या स्थानावर आहे.
DC vs MI, IPL 2024 43th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 43वा सामना (IPL 2024) दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे. या मोसमात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असेल. शेवटच्या वेळी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स संघ 4 सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने 3 सामने जिंकले असून संघ 8व्या स्थानावर आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करण्यासाठी आलेल्या दिल्लीने मुंबईला 258 धांवांचे लक्ष्य दिले आहे. दिल्लीसाठी स्फोटक फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने 84 धावांची शानदार खेळी केली. मुंबई इंडियन्सकडून ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकात 258 धावा करायच्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)