Delhi Court Grants Divorce To Shikhar Dhawan: पत्नीने केलेल्या क्रूरतेच्या आधारावर क्रिकेटपटू शिखर धवनला कौटुंबिक न्यायालयाकडून घटस्फोट मंजूर

पत्नीने धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांना विभक्त होऊन बराच काळ लोटला आहे. आता दिल्लीतील एका कौटुंबिक न्यायालयाने बुधवारी शिखर धवनला त्याची विभक्त पत्नी आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला. न्यायाधीश हरीश कुमार यांनी धवनने आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाच्या याचिकेत केलेले सर्व आरोप मान्य केले. आयेशाने तिच्या विरुद्धच्या आरोपांना विरोध केला नाही तसेच ती स्वतःचा बचाव करण्यात अपयशी ठरली. पत्नीने धवनला त्याच्या एकुलत्या एक मुलापासून वर्षानुवर्षे वेगळे राहण्यास भाग पाडून मानसिक त्रास दिल्याचे न्यायाधीशांनी सांगितले. या दाम्पत्याच्या मुलाच्या कायमस्वरूपी कोणाच्या ताब्यात देण्यात यावे याबाबत न्यायालयाने कोणताही आदेश देण्यास नकार दिला. मात्र न्यायालयाने धवनला आपल्या मुलाला भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये योग्य कालावधीसाठी भेटण्यासाठी आणि व्हिडिओ कॉलवर त्याच्याशी चॅट करण्याचे अधिकार दिले. (हेही वाचा: Rohit Sharma Viral Video: 'क्या यार...' पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिली अनोखी प्रतिक्रिया, व्हिडिओ होतोय व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)