DC vs PBKS Live Score Update: प्रभसिमरनचे वादळी शतक, दिल्लीसमोर विजयासाठी पंजाबचे 167 धावांचे लक्ष्य
पावरप्लेमध्ये पंजाबने तीन विकेट गमावल्या होत्या. सहा षटकात पंजाबने तीन विकेट गमावत 46 धावा केल्या होत्या.
प्रभसिमरनच्या (Prabhsimran Singh) शतकी खेळीच्या बळावर पंजाबने (Punjab Kings) 167 धावांपर्यंत मजल मारली. प्रभसिमरनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीकडून (Delhi Capital) इशांत शर्माने दोन विकेट घेतल्या. दिल्लीला विजयासाठी 168 धावांचे आव्हान आहे. पावरप्लेमध्ये पंजाबने तीन विकेट गमावल्या होत्या. सहा षटकात पंजाबने तीन विकेट गमावत 46 धावा केल्या होत्या. कर्णधार शिखर धवन सात धावा काढून बाद झाला. लियाम लिव्हिंगस्टोन यालाही मोठी खेळी करता आली नाही. लिव्हिंगस्टोन चार धावा काढून बाद झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)