DC vs KKR, IPL 2022: आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणी नाही करू शकला असा रेकॉर्ड David Warner याच्या नावे, जाणून कराल कौतुक

IPL 2022, DC vs KKR: डेविड वॉर्नरने गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 1000 धावा पूर्ण करून इतिहास रचला. आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जविरुद्ध यापूर्वीच 1000 धावा करणारा ऑस्ट्रेलियन पहिला फलंदाज ठरला. आयपीएल 2022 च्या 41 व्या सामन्यात वॉर्नरने 26 चेंडूत 8 चौकारांसह 42 धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक 8 धावांनी हुकले असले तरी त्याने कोलकाताविरुद्ध 1000 धावा पूर्ण केल्या.

डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

DC vs KKR, IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर डेविड वॉर्नरने  (David Warner) केकेआरविरुद्ध 42 धावा केल्या. या खेळीसह त्याने असा विक्रम केला जो यापूर्वी कोणताही फलंदाज करू शकला नाही. आयपीएलमध्ये दोन वेगवेगळ्या संघांविरुद्ध 1000 धावा करणारा वॉर्नर हा पहिला फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने याआधी पंजाब किंग्जविरुद्ध (Punjab Kings) 1000 धावा पूर्ण केल्या तर आज कोलकात्याविरुद्ध धावांचा पल्ला गाठला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now