1043 दिवसांनंतर David Warner ने ठोकले आंतरराष्ट्रीय शतक, जाता जाता लहान मुलाला दिले खास गिफ्ट (Watch Video)

डेव्हिड वॉर्नरने मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केला. डेव्हिड वाॅर्नरने 102 बॅालमध्ये 106 रन बनवले

Photo Credit - Twitter

काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा अडीच वर्षानंतर संपली. त्याचप्रमाणे आता 2 वर्षे 10 दिवसांनी म्हणजेच संपूर्ण 1043 दिवसांनंतर डेव्हिड वॉर्नरची (David Warner) आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षाही संपुष्टात आली आहे. डेव्हिड वॉर्नरने मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा पराक्रम केला. डेव्हिड वाॅर्नरने 102 बॅालमध्ये 106 रन बनवले, त्याच्या या पारीमध्ये 8 चौकार आणि 2 षटकाराचा समावेश होता. त्याची ही पारी संपल्यानंतर त्याने लहान मुलाला आपले ग्लवज दिले.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now