David Warner New Records: डेव्हिड वॉर्नरने रचला इतिहास, विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करून सचिनचा विक्रम मोडला
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध आयसीसी विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि डेव्हिड वॉर्नरने मिचेल मार्शसह सलामी दिली.
ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) रविवारी (8 ऑक्टोबर) भारत विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात नवा इतिहास रचला. या सामन्यात 9 धावा करत वॉर्नरने एकदिवसीय विश्वचषकातील 1000 धावा पूर्ण केल्या. यासह वॉर्नर विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध आयसीसी विश्वचषक 2023 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि डेव्हिड वॉर्नरने मिचेल मार्शसह सलामी दिली. आणि यासह तो सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्सला मागे टाकून विश्वचषकातील सर्वात जलद 1000 धावा करणारा खेळाडू बनला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)