DC vs KKR, IPL 2023 Match 28 Live Score Update: रोमांचक सामन्यात दिल्लीने कोलकाताचा पराभव करून विजयाची चव चाखली, डेव्हिड वॉर्नरने खेळली कर्णधारपदाची खेळी

दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा चार गडी राखून पराभव करत या मोसमातील पहिला विजय नोंदवला.

DC vs KKR, IPL 2023 Match 28 Live Score Update: रोमांचक सामन्यात दिल्लीने कोलकाताचा पराभव करून विजयाची चव चाखली, डेव्हिड वॉर्नरने खेळली कर्णधारपदाची खेळी

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 28 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा चार गडी राखून पराभव करत या मोसमातील पहिला विजय नोंदवला. तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 127 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्ससाठी सलामीवीर जेसन रॉयने सर्वाधिक 43 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादव, एरिक नॉर्जे, इशांत शर्मा, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाने 19.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 57 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून वरुण चक्रवर्ती, अनुकुल राय आणि नितीश राणा यांनी सर्वाधिक दोन बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2023 12:23 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).