CSK vs RCB IPL 2021 Match 19: Faf du Plessis याची अर्धशतकी खेळी, जडेजाचा षटकारांचा पाऊस; चेन्नईचे आरसीबीला 192 धावांचं तगडं आव्हान

चेन्नईसाठी फाफ डु प्लेसिसने 41 चेंडूत 50 धावा केल्या तर रवींद्र जडेजा 62 धावा करून नाबाद परतला.

फाफ डु प्लेसिस आणि रुतूराज गायकवाड (Photo Credit: Twitter)

CSK vs RCB IPL 2021 Match 19: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघातील आयपीएलच्या 19व्या सामन्यात सीएसकेने (CSK) टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत 4 विकेट गमावून 191 धावांपर्यंत मजल मारली आणि आरसीबीला (RCB) विजयासाठी 192 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. चेन्नईसाठी फाफ डु प्लेसिसने (Faf du Plesis) 41 चेंडूत 50 धावा केल्या तर रुतुराज गायकवाडने 33 धावांचे योगदान दिले. कर्णधार एमएस धोनी 2 धाव आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 62 धावा करून नाबाद परतले. दुसरीकडे, आरसीबीसाठी हर्षल पटेलने पुन्हा चमकदार कामगिरी करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शिवाय, युजवेंद्र चहलला 1 विकेट मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)