Vijay Hazare Trophy 2024-25: IPL आधीच CSK चा फलंदाज चमकला, 6 चेंडूत ठोकले सलग 6 चौकार
राजस्थानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात जगदीशनने 52 चेंडूत 65 धावांची जलद खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 10 चौकार मारले. जगदीशनने आपल्या डावाची सुरुवात धमाकेदार केली आणि डावाच्या दुसऱ्या षटकात चौकारांचा पाऊस पाडला.
N Jagadeesan Six Fours: एकेकाळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा विकेटकीपर फलंदाज एन जगदीसनने (N Jagadeesan) विजय हजारे ट्रॉफीमध्ये Vijay Hazare Trophy 2024-25) फलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. राजस्थानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात जगदीशनने 52 चेंडूत 65 धावांची जलद खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 10 चौकार मारले. जगदीशनने आपल्या डावाची सुरुवात धमाकेदार केली आणि डावाच्या दुसऱ्या षटकात चौकारांचा पाऊस पाडला. जगदीशनने सहा चेंडूत 6 चौकार मारले आणि त्या षटकात 29 धावा केल्या.
एन जगदीसनने 6 चेंडूत ठोकले सलग 6 चौकार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)