क्रिकेटर Hardik Pandya आणि Natasa Stankovic पुन्हा अडकले लग्नबंधनात; Valentine’s Day च्या मुहूर्तावर ख्रिश्चन रितीरिवाजाने पार पडला सोहळा (See Photos)
नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याने तीन वर्षांपूर्वी 31 मे 2020 रोजी कोर्ट मॅरेज केले होते, कारण त्यावेळी नताशा गरोदर होती.
क्रिकेटर हार्दिक पांड्याने उदयपूरमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत पुन्हा लग्न केले. या लग्नाचे अनेक फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत. यापूर्वी या जोडप्याने कोर्ट मॅरेज केले होते आणि आता त्यांनी पूर्ण ख्रिश्चन रितीरिवाजाने लग्न केले आहे. नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्याने तीन वर्षांपूर्वी 31 मे 2020 रोजी कोर्ट मॅरेज केले होते, कारण त्यावेळी नताशा गरोदर होती. अशा स्थितीत हे लग्न फार धामधुमीत झाले नव्हते. त्यानंतर जुलै 2020 मध्येच त्यांना मुलगाही झाला. अशा परिस्थितीत मुलगा मोठा झाल्यानंतर जोडप्याने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राजस्थानच्या उदयपूरमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांचे लग्न पार पडले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)