Cricket World Cup 2023 Opening Day Google Doodle: आजपासून रंगणार क्रिकेट विश्वचषकाचा थरार; गूगलने शेअर केलं खास डूडल
आज अहमदाबादच्या Narendra Modi Stadium वर क्रिकेट वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळवला जाणार आहे.
आजपासून क्रिकेट विश्वचषक 2023 ला सुरूवात होत आहे. या क्रिकेट विश्वातील या थरारक सामन्यांत जगातील 10 संघ एकमेकांना भिडणार आहेत. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी गूगलने आपल्या होम पेज वर खास डूडल शेअर केले आहे. ज्यामध्ये दोन बदकं धावताना दिसत आहेत. आज अहमदाबाद मध्ये न्युझिलंड आणि इंग्लंड मध्ये पहिला सामना खेळला जाणार आहे. यजमान पदी असलेल्या भारत देशाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणार आहे. ICC Men's Cricket World Cup 2023: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, आता डीडी स्पोर्ट्सवर पाहू शकतात आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे सामने.
पहा ग़ूगल डूडल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)