Rohit Sharma New Record: रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा मोठा विक्रम
यापुर्वी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध वनडेत 85 षटकार मारले होते.
अहमबाद येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने शानदार खेळी केली पण त्याचे अर्धशतक हुकले. रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत रोहित शर्माने तीन षटकार आणि 4 चौकार ठोकले. रोहित शर्माने आपल्या या खेळीत मोठा विक्रम नावावर केला आहे.वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झालाय. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 87 षटकार ठोकलेत. यापुर्वी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध वनडेत 85 षटकार मारले होते.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)