IND vs ZIM 4th T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता खेळवला जाईल. पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. हरारे येथे होणारा चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकताच भारत मालिका जिंकेल. तर, दुसरीकडे, झिम्बाब्वेला पुन्हा एकदा टीम इंडियाला चकित करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आवेश खानच्या जागी तुषार देशपांडेला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा
4TH T20I. India Won the toss and Elected to Field. https://t.co/AaZlvFYFmF #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)