MI vs CSK Toss Update: चेन्नई सुपर किंग्जने मुंबईविरुद्ध नाणेफेक जिंकली, कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नंबर टू होण्यासाठी लढत आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 49 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नंबर टू होण्यासाठी लढत आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल. इतकंच नाही तर त्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यताही वाढणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मुंबईचा रेकॉर्ड CSK पेक्षा मजबूत आहे. या मैदानावर दोन्ही संघांमधले गेले पाच सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@ChennaiIPL win the toss and elect to field first against @mipaltan.
Follow the match ▶️ https://t.co/hpXamvn55U #TATAIPL | #CSKvMI pic.twitter.com/ucl96iF7p5
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2023 03:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

