CSK vs MI, Live Score Update: चेन्नई सुपर किंग्ज संघाची तिसरी विकेट पडली, 12 धावा करून अंबाती रायडू बाद
दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नंबर टू होण्यासाठी लढत आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 49 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नंबर टू होण्यासाठी लढत आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल. इतकंच नाही तर त्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यताही वाढणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मुंबईचा रेकॉर्ड CSK पेक्षा मजबूत आहे. या मैदानावर दोन्ही संघांमधले गेले पाच सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 139 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून नेहल वढेराने सर्वाधिक 64 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 140 धावांची गरज आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. अंबाती रायुडू 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्कोअर 105/3.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)