Chennai Beat Mumbai: चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून केला पराभव, सलामीवीर डेव्हॉन कॉनवेची जबरदस्त फलंदांजी

दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला.

CSK (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 49 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 139 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून नेहल वढेराने सर्वाधिक 64 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने 17.4 षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीवीर डेव्हन कॉनवेने सर्वाधिक 44 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून पियुष चावलाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now