ICC Cricket World Cup 2023 Points Table: अफगाणिस्तानला पराभूत करत भारताने पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, पाकिस्तानला पछाडले

भारत पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आला आहे. न्यूझीलंड संघ पहिल्या स्थानावर आहे. भारताने विश्वचषकातील दोन्ही सामने एकतर्फी जिंकले आहेत, त्यामुळे भारताचा नेट रन रेट खूपच चांगला झाला आहे.

भारताने अफगाणिस्तानला एकतर्फी सामन्यात (India Beat Afghanistan) पराभूत केले आहे. या विजयानंतर भारताला गुणतालिकेतही मोठा फायदा झाला आहे. वर्ल्ड कप पॉइंट टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. आता भारत पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आला आहे. न्यूझीलंड संघ पहिल्या स्थानावर आहे. भारताने विश्वचषकातील दोन्ही सामने एकतर्फी जिंकले आहेत, त्यामुळे भारताचा नेट रन रेट खूपच चांगला झाला आहे. भारताचा पुढील सामना हाय व्होल्टेजचा असणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. दुपारी 2.00 वाजता सामना खेळवण्याच सुरुवात होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now