Brian Lara Got Emotional: ब्रायन लारा कॉमेंट्री बॉक्समध्ये रोखू शकला नाही आपले अश्रू, वेस्ट इंडिजच्या विजयानंतर झाला भावूक; पाहा व्हिडिओ

वेस्ट इंडिजने जवळपास 30 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिली कसोटी जिंकली आहे. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा हिरो होता शमर जोसेफ. जोसेफने दुसऱ्या डावात एकूण 68 धावांत 7 बळी घेतले.

Brian Lara Got Emotional: ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजने यजमान ऑस्ट्रेलियाचा 8 धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ 207 धावांत गारद झाला. वेस्ट इंडिजने जवळपास 30 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिली कसोटी जिंकली आहे. वेस्ट इंडिजच्या या विजयाचा हिरो होता शमर जोसेफ. जोसेफने दुसऱ्या डावात एकूण 68 धावांत 7 बळी घेतले. या ऐतिहासिक विजयानंतर वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ आनंदाने नाचत होता, तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेला माजी अनुभवी कर्णधार ब्रायन लारा याला आपले अश्रू आवरता आले नाहीत. समालोचन करताना ब्रायन लारा भावूक झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ब्रायन लाराच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement