LSG vs KKR: 'बोलो तारा रा रा...' प्लेऑफमध्ये पोहोचल्याचा आनंद लखनौने केला साजरा, पुरणने टी-शर्ट काढुन केला डान्स (Watch Video)

लखनौ सुपर जायंट्सने शनिवारच्या सामन्यात कोलकाताचा 1 धावाने पराभव करत आगेकूच केली. विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. देशी असो वा विदेशी, सर्व खेळाडूंनी धमाल केली.

लखनौ सुपर जायंट्स (LSG) आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे. गुजरात, चेन्नई, लखनौनंतर प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. लखनौ सुपर जायंट्सने शनिवारच्या सामन्यात कोलकाताचा 1 धावाने पराभव करत आगेकूच केली. विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. देशी असो वा विदेशी, सर्व खेळाडूंनी धमाल केली. सामना संपल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले तेव्हा तेथे पंजाबी गाणे वाजत होते. मग काय होतं, निकोलस पूरनसह अनेक खेळाडूंनी आपला गेटअप बदलला आणि नाचायला सुरुवात केली. निकोलस पूरन शर्टलेस दिसला. पूरनने फक्त हाफ पँट घातली होती आणि दिलर मेहंदीमधील 'बोलो तारा रा रा' गाण्यावर तो जबरदस्त नाचत होता.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement