Birmingham CWG 2022: राष्ट्रीकुल खेळांसाठी पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ जाहीर, पाहा कोणाकडे संघाची कमान

बर्मिंगहॅम येथे 29, 31 जुलै आणि 3 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा अनुक्रमे बार्बाडोस, भारत आणि ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहेत. कर्णधार बिस्माह मारूफ, महिला संघाचे मुख्य निवडकर्ता अस्माविया इक्बाल आणि मुख्य डेविड हेम्प यांच्याशी चर्चनंतर संघ जाहीर करण्यात आला.

पाकिस्तान महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter)

Birmingham CWG 2022: आगामी राष्ट्रकुल खेळांसाठी आणि बेलफास्टमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी (Tri Series) पाकिस्तानचा 18 सदस्यीय महिला संघ जाहीर केला आहे. तिरंगी मालिकेत यजमान आयर्लंड आणि विश्वविजेते ऑस्ट्रेलिया यांचाही समावेश आहे. तिरंगी मालिका 16 ते 24 जुलै दरम्यान होणार असून त्यानंतर इंग्लंडच्या बर्मिंघम (Birmingham) येथे राष्ट्रकुल खेळ (Commonwealth Games) सुरू होतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)