ICC Cricket World Cup 2023: मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला व्हिसा मंजूर, दोन्ही संघ त्यांच्या योजनांनुसार करु शकतात प्रवास

म्हणजे सहा दिवसांपूर्वीच त्यांचा अर्ज आला होता आणि या कालावधीत केवळ पाच कामकाजाचे दिवस होते. या संदर्भात, व्हिसा देण्यास कोणताही विलंब झाला नाही, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की भारत व्हिसा देण्यास विलंब करत आहे.

PAK Team (Photo Credit - Twitter)

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी भारताने पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) क्रिकेट संघांना व्हिसा जारी केला आहे. दोन्ही संघ आता त्यांच्या निश्चित वेळापत्रकानुसार विश्वचषकासाठी भारतात येऊ शकतात. पाकिस्तानने 19 सप्टेंबरला व्हिसासाठी अर्ज पाठवला होता. म्हणजे सहा दिवसांपूर्वीच त्यांचा अर्ज आला होता आणि या कालावधीत केवळ पाच कामकाजाचे दिवस होते. या संदर्भात, व्हिसा देण्यास कोणताही विलंब झाला नाही, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की भारत व्हिसा देण्यास विलंब करत आहे. पीसीबीने यासंदर्भात आयसीसीकडे तक्रारही केली होती. पाकिस्तान क्रिकेट संघाचा वर्ल्ड कप 2023 मध्ये पहिला सामना 6 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)