Shivam Dube Ruled Out: टीम इंडियाला मोठा झटका, बांगलादेशविरुद्ध शिवम दुबे टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूची लागली लाॅटरी

बोर्डाने सांगितले की, दुबेला पाठीचा त्रास आहे, त्यामुळे तो या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही.

Shivam Dube And Tilak Verma (Photo Credit - BCCI)

IND vs BAN T20I Series 2024: बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका (IND vs BAN T20I Series 2024) सुरू होण्याच्या अवघ्या 24 तासांपूर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा झटका बसला आहे. ग्वाल्हेरमधील सामन्यापूर्वी टीम इंडियाचा अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dube) दुखापतीमुळे बाहेर आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी त्याच्या दुखापतीबद्दल माहिती दिली आणि सांगितले की तीन सामन्यांच्या मालिकेतून तो बाहेर पडला आहे. त्याच्या जागी तिलक वर्माला मालिकेत संधी देण्यात आली आहे. बोर्डाने सांगितले की, दुबेला पाठीचा त्रास आहे, त्यामुळे तो या मालिकेत भाग घेऊ शकणार नाही. नुकताच टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाचा एक भाग असलेला शिवम दुबे हा देखील श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाचा एक भाग होता पण तिथे तो काही विशेष करू शकला नाही. असे असतानाही त्याला संघात स्थान मिळाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)