ENG vs PAK T20: पाचव्या टी-20 सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका, वेगवान गोलंदाज रुग्णालयात दाखल
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नसीम शाह याला खूप ताप असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची डेंग्यू चाचणीही झाली असून काही वेळात त्याचा निकालही येईल.
सात सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पाचवा सामना आज म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी इंग्लंड आणि पाकिस्तान (ENG vs PAK) यांच्यात होणार आहे, मात्र त्याआधीच यजमान पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नसीम शाह याला खूप ताप असून त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची डेंग्यू चाचणीही झाली असून काही वेळात त्याचा निकालही येईल. इंग्लंडविरुद्धच्या 5व्या T20 मध्ये त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. तीव्र तापाचा सामना करणे इतके सोपे होणार नाही आणि वेगवान गोलंदाजाला बरे वाटले तरी मैदानात उतरणे अवघडच आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)