Asia Cup 2022: भारताला मोठा धक्का; दुखापतीमुळं रवींद्र जडेजा स्पर्धेतून बाहेर, अक्षर पटेलची निवड

जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

Photo Credit - Twitter

भारताचा अष्टपेलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळं आशिया कप 2022 स्पर्धेतुन बाहेर पडला आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याच्या जागी, अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे आणि तो लवकरच दुबईत येवुन संघात सामील होईल.

आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now