WPL 2023: गुजरात जायंट्सला मोठा धक्का, दुखापतीमुळे बेथ मुनी संपूर्ण स्पर्धेतुन बाहेर, 'या' स्टार खेळाडूला मिळाली संधी
संघाची कर्णधार बेथ मुनी (Beth Mooney) संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाली आहे. या मोसमात बेथ मुनी संघाची कर्णधार होती. पण त्याच्या दुखापतीमुळे आता स्नेह राणाला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL 2023) आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. यापैकी गुजरात जायंट्सचा संघ एकूण तीन सामने खेळला आहे. गुजरात जायंट्सला त्यांच्या पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. आणि बुधवारी झालेल्या सामन्यात त्याने आरसीबीविरुद्ध विजय मिळवला. दरम्यान, गुजरात जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाची कर्णधार बेथ मुनी (Beth Mooney) संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाली आहे. या मोसमात बेथ मुनी संघाची कर्णधार होती. पण त्याच्या दुखापतीमुळे आता स्नेह राणाला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. गुजरात जायंट्सच्या संघाने मुनीची कमतरता भरून काढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डचा (Laura Wolvaardt) समावेश केला आहे. नुकत्याच झालेल्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर लॉरा वोल्वार्डने आपल्या संघाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)