Babar Azam ला मोठा झटका, कर्णधारपदानंतर आणखी एक मोठी जबाबदारी गेली
पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी बाबर आझमकडून आणखी एक जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. पाकिस्तान संघाने बाबरला सलामीवीरातून काढून टाकले आहे. बराच काळ सलामीवीर म्हणून संघाकडून खेळणाऱ्या बाबर आझम या खेळाडूचे पद काढून घेण्यात आले आहे.
PAK vs NZ: पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) त्याच्या खराब कामगिरीमुळे सतत ट्रोल केले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धही माजी कर्णधाराच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका होत होती. आता पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी बाबर आझमकडून आणखी एक जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. पाकिस्तान संघाने बाबरला सलामीवीरातून काढून टाकले आहे. बराच काळ सलामीवीर म्हणून संघाकडून खेळणाऱ्या बाबर आझम या खेळाडूचे पद काढून घेण्यात आले आहे. आता बाबर आझम मधल्या फळीत खेळताना दिसणार आहे. आता बाबर आझमच्या जागी सॅम अयुबला सलामी देण्यात येणार असल्याचे पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत बाबर आणि रिझवानची सलामीची जोडी तुटली आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series: मालिकेच्या एक दिवस आधी अफगाणिस्तानला मोठा धक्का, मॅचविनिंग खेळाडू Rashid Khan मालिकेतुन बाहेर)
Babar Azam set to lose his opening position in T20is.
Saim Ayub likely to open with Rizwan in the upcoming T20is against New Zealand. pic.twitter.com/ffudsvxCHN
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 10, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2024 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

