Collision of Sri Lankan Players: लाइव्ह मॅचमध्ये मोठा अपघात, श्रीलंकेच्या दोन खेळाडूंची जोरदार टक्कर, स्ट्रेचरवर न्यावं लागलं बाहेर (Watch Video)

भारताने हा सामना 317 धावांनी जिंकला. यासह मालिकाही 3-0 अशी खिशात घातली.

collision of srilankan players (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd ODI: आज तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. भारताने हा सामना 317 धावांनी जिंकला. यासह मालिकाही 3-0 अशी खिशात घातली. भारताने हा सामना 317 धावांनी जिंकून वनडे इतिहासातील हा सर्वात मोठा विजय नोंदवला. दरम्यान, भारतीय डावाच्या 43व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या सीमारेषेवर कोहलीचा फटका वाचवण्याच्या प्रयत्नात अशेन बंडारा आणि जेफ्री वँडर्से यांच्यात टक्कर झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही खेळाडू जमिनीवर झोपले आणि खूप वेदना होत असल्याचे दिसून आले. घाईघाईत श्रीलंकेचे फिजिओ मैदानावर पोहोचले आणि त्यांनी तत्काळ उपचार केले, मात्र यामुळे दोन्ही खेळाडूंना फारसा दिलासा मिळाला नाही.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement