ICC Test Rankings: एका कसोटीच्या जोरावर ठरला सर्वोत्तम फलंदाज; रुटची राजवट संपली, विराट-रोहित खूप मागे

रूट आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. टॉप-10 मध्ये फक्त दोन भारतीय फलंदाज आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लबुशेन हा कसोटीतील नंबर-1 फलंदाज ठरला आहे. आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत तो पहिल्या स्थानावर आहे. यासह इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटचा कसोटीतील नंबर-1 फलंदाज म्हणून राजवट संपुष्टात आली आहे. रूट आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. टॉप-10 मध्ये फक्त दोन भारतीय फलंदाज आहेत. ऋषभ पंत पाचव्या तर रोहित शर्मा नवव्या स्थानावर आहे. विराट कोहलीला ताज्या क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असला तरी तो नव्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या लबुशेनपेक्षा खूपच मागे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement