RCB vs CSK, IPL 2024 Live Streaming: प्लेऑफच्या तिकिटासाठी बंगळुरू आणि चेन्नईमध्ये होणार जोरदार लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.

RCB vs CSK (Photo Credit - X)

 RCB vs CSK, IPL 2024: आयपीएल 2024 चा 68 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी, 18 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल. हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असेल, त्यामुळे या सामन्यात उत्कंठा भरलेली असेल. चेन्नई सुपर किंग्जने 13 पैकी 7 सामने जिंकले आहेत, तर 6 सामने गमावले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघ 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरसीबी 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत जर त्यांनी सीएसकेला पराभूत केले आणि चांगला नेट रनरेट केला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. मोबाईलवर, जिया सिनेमा ॲपवर तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)