England Test Captain: इंग्लंड क्रिकेट टीमला माजी कर्णधार जो रुटचा उत्तराधिकारी मिळाला, Ben Stokes आता सांभाळणार कसोटी संघाची कमान!

स्टायलिश इंग्लिश अष्टपैलू बेन स्टोक्स याची इंग्लंडच्या नवीन कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात येणार आहे. पुढील 48 तासांत स्टोक्सची नियुक्ती निश्चित केली जाईल. तत्पूर्वी, जो रुट 15 एप्रिल रोजी पदावरून पायउतार झाला. UK च्या iNews च्या वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड या आठवड्याच्या अखेरीस नवीन कर्णधाराची घोषणा करेल.

बेन स्टोक्स (Photo Credit: PTI)

बेन स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंड क्रिकेट संघाचा (England Cricket Team) कसोटी कर्णधार बनण्याचे आता निश्चित झाले आहे. यापूर्वी जो रूटने (Joe Root) इंग्लंड संघाच्या खराब कामगिरीनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, तेव्हापासून ECB नव्या कर्णधाराच्या शोधात होते. आता बोर्डाचे संचालक रॉब की यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर स्टोक्सने कर्णधार होण्यास होकार दिल्याचे समोर आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement