Team India Victory Parade Live Update: विजय परेडपूर्वी मुंबईत पावसाला सुरुवात, वानखेडे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले (Watch Video)

टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. मात्र भारतीय संघ येथे पोहोचण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली.

Team India Victory Parade: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला आहे. टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. मात्र भारतीय संघ येथे पोहोचण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली. टीम इंडियालाही विजयाची परेड करावी लागणार आहे. भारतीय संघाचे हजारो चाहते वानखेडे स्टेडियमवर पोहोचले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement