IND vs WI Series 2023: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाने वेस्ट इंडिजचे दिग्गज सर गारफिल्ड सोबर्स यांची घेतली भेट, व्हिडिओ आला समोर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 12 जुलैपासून डॉमिनिका आणि पोर्ट ऑफ स्पेन येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. बीसीसीआयने (BCCI) वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधारासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सदस्यांनी येथे महान क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांची भेट घेतली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 12 जुलैपासून डॉमिनिका आणि पोर्ट ऑफ स्पेन येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. बीसीसीआयने (BCCI) वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधारासोबतच्या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. क्रिकेटच्या सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक असलेल्या 86 वर्षीय सोबर्सने 93 कसोटीत 8032 धावा केल्या आणि 235 विकेट्सही घेतल्या. रोहित, विराट कोहली, शुबमन गिल, रविचंद्रन अश्विन आणि भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे सोबर्स यांना भेटले होते. वेस्ट इंडिजचा हा महान खेळाडू त्याच्या पत्नीसोबत होता.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement