AUS vs ENG: टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाने दाखवले खरे रंग; बेईमानी करुन जिंकायचे होते, इंग्लिश खेळाडूला दिला धक्का (Watch Video)
डेव्हिड वॉर्नरने 73 धावा करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या, पण तो बाद होताच सर्व आशा धुळीला मिळाल्या. मात्र, ज्या षटकात डेव्हिड वॉर्नरची विकेट पडली, त्या षटकात मॅथ्यू वेडने खेळाच्या भावनेविरुद्ध असे काही केले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा (ENG vs AUS) 8 धावांनी पराभव केला. डेव्हिड वॉर्नरने 73 धावा करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या, पण तो बाद होताच सर्व आशा धुळीला मिळाल्या. मात्र, ज्या षटकात डेव्हिड वॉर्नरची विकेट पडली, त्या षटकात मॅथ्यू वेडने खेळाच्या भावनेविरुद्ध असे काही केले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली. 17व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर वेड मोठा फटका मारण्याच्या तयारीत होता, पण चुकीच्या वेळेमुळे चेंडू त्याच्याच डोक्याभोवती हवेत उडाला. पण मॅथ्यू वेडला याची कल्पना नव्हती, पण मार्क वूडला त्याच्या दिशेने येताना पाहून वेड क्रीजच्या आत जाण्यासाठी धावला, त्यादरम्यान त्याने डाव्या हाताचा वापर करून मार्क वुडला झेल घेण्यापासून रोखले आणि त्याला त्या झेलपासुन लांब ढकलताना दिसला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)