DC vs RCB: सामन्यापूर्वी विराट कोहलीने बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांची भेट घेवुन पायाल केला स्पर्श, व्हिडिओ व्हायरल

हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, दोन्ही संघांना जिंकायचे आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये, लीगचा 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (DC vs RCB) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, दोन्ही संघांना जिंकायचे आहे. त्याचवेळी, सामना सुरू होण्यापूर्वी, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तो व्हिडिओ आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा (Virat Kohli) आहे, ज्यामध्ये तो त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या पायाला स्पर्श करत आहे. यानंतर प्रशिक्षकाने कोहलीच्या पाठीवर हात ठेवला. यानंतर कोहली आणि राजकुमारमध्ये काही वेळ चर्चा झाली आणि त्यानंतर कोहली पुन्हा सरावाला गेला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)