IND vs NZ 1st T20: न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी एमएस धोनीने भारतीय संघाची घेतली अचानक भेट, सगळे खेळाडू झाले अवाक (Watch Video)
टीम इंडियाचे खेळाडू सरावासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते, त्यादरम्यान माजी कर्णधार एमएस धोनी तेथे आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या 27 जानेवारीला T20 मालिकेतील पहिला सामना होणार आहे. रांचीमध्ये खेळल्या जाणार्या मालिकेतील हा पहिलाच सामना असेल. हार्दिक पांड्या टी-20 फॉरमॅटचे कर्णधार आहे. टीम इंडियाचे खेळाडू सरावासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते, त्यादरम्यान माजी कर्णधार एमएस धोनी तेथे आला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एमएस धोनी टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या, सलामीवीर इशान किशन, युजवेंद्र चहल एमएस धोनीशी बोलताना दिसत आहेत.
पहा व्हिडीओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 26, 2023 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

