Ireland vs South Africa 2nd T20I 2024 Highlights: आयर्लंडने केला मोठा गेम, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेला लोळवलं; येथे पाहा सामन्याचे हायलाइट्स
आयर्लंडने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखली. याआधी दोन्ही संघांमध्ये एकूण 6 टी-20 सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये आफ्रिकन संघाने आयर्लंडला एकही सामना जिंकू दिला नाही
Ireland National Cricket Team vs South Africa National Cricket Team 2nd T20 2024 Highlights: आयर्लंडने रविवारी 29 सप्टेंबर रोजी दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 10 धावांनी पराभव (IRE Beat SA T20I) करत मोठा पराभव केला. यासह आयर्लंडने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दक्षिण आफ्रिकेला पराभवाची चव चाखली. याआधी दोन्ही संघांमध्ये एकूण 6 टी-20 सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये आफ्रिकन संघाने आयर्लंडला एकही सामना जिंकू दिला नाही. आयर्लंडच्या या विजयासह, मालिका 1-1 ने संपली, दुर्दैवाने मालिकेचा विजेता ठरवण्यासाठी तिसरा सामना नाही. आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका फक्त 2 सामन्यांची होती. आता या दोन्ही संघांमध्ये 2 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. आयर्लंडच्या मोठ्या विजयामुळे आता क्रिकेटप्रेंमी वनडे मालिकेवरही नजर ठेवुन असतील.