MS Dhoni's No.7 jersey Has Been Retired: एमएस धोनीबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, 7 क्रमांकाची जर्सी होणार निवृत्त

धोनीच्या निवृत्तीनंतर तीन वर्षांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, बीसीसीआयने धोनीची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की...

भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. धोनी मात्र अजूनही आयपीएल खेळतो. धोनीच्या निवृत्तीनंतर तीन वर्षांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, बीसीसीआयने धोनीची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की, बीसीसीआयने खेळाडूंना स्पष्टपणे सांगितले आहे की, ते टीम इंडियामध्ये असताना 7 नंबरची जर्सी घालू शकत नाहीत. इंडियन एक्सप्रेसने लिहिले आहे की, टीम इंडियाच्या युवा खेळाडू आणि सध्याच्या खेळाडूंना सांगितले आहे की ते जर्सी नंबर-7 घालू शकत नाहीत. सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात स्पष्टपणे लिहिले आहे की बीसीसीआयने धोनीची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. (हे देखील वाचा: MS Dhoni Attends Fan's Birthday Party: चाहत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एमएस धोनी पोहोचला थेट त्याच्या घरी, केक कापतानाच्या व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement