MS Dhoni's No.7 jersey Has Been Retired: एमएस धोनीबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय, 7 क्रमांकाची जर्सी होणार निवृत्त
धोनीच्या निवृत्तीनंतर तीन वर्षांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, बीसीसीआयने धोनीची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की...
भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. धोनी मात्र अजूनही आयपीएल खेळतो. धोनीच्या निवृत्तीनंतर तीन वर्षांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, बीसीसीआयने धोनीची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की, बीसीसीआयने खेळाडूंना स्पष्टपणे सांगितले आहे की, ते टीम इंडियामध्ये असताना 7 नंबरची जर्सी घालू शकत नाहीत. इंडियन एक्सप्रेसने लिहिले आहे की, टीम इंडियाच्या युवा खेळाडू आणि सध्याच्या खेळाडूंना सांगितले आहे की ते जर्सी नंबर-7 घालू शकत नाहीत. सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात स्पष्टपणे लिहिले आहे की बीसीसीआयने धोनीची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. (हे देखील वाचा: MS Dhoni Attends Fan's Birthday Party: चाहत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एमएस धोनी पोहोचला थेट त्याच्या घरी, केक कापतानाच्या व्हिडिओ व्हायरल)
MS Dhoni's No.7 jersey has been officially retired by the BCCI. (Indian Express). pic.twitter.com/jnty27dkJ4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 10:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

