BCCI: निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्माची पुन्हा एकदा निवड, 'या' माजी दिग्गजांच्या नावांवर शिक्कामोर्तब

बीसीसीआयला निवडकर्ता पदासाठी 600 हून अधिक लोकांकडून अर्ज आले होते. क्रिकेट सल्लागार समितीने निवड समितीची निवड केली आहे.

BCCI Board (Photo Credit - Twitter)

BCCI Selection Committee: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवीन निवड समितीची घोषणा केली आहे. चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची या पदासाठी पुन्हा एकदा निवड झाली आहे. चेतन शर्मा यांच्याशिवाय शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बीसीसीआयला निवडकर्ता पदासाठी 600 हून अधिक लोकांकडून अर्ज आले होते. क्रिकेट सल्लागार समितीने निवड समितीची निवड केली आहे. बीसीसीआयने सांगितले की चेतन शर्मा पुन्हा एकदा निवड समितीचे अध्यक्ष असतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement