BCCI चा मोठा निर्णय, क्रिकेटपटू रिद्धिमान साहा याला धमकावल्या प्रकरणी पत्रकार Boria Majumdar यांच्यावर 2 वर्षांची बंदी
रिद्धिमान साहाला आक्षेपार्ह संदेश पाठवल्याबद्दल BCCI ने क्रीडा पत्रकार बोरिया मुझुमदारवर 2 वर्षांची बंदी घातली आहे. बीसीसीआयच्या समितीने बोरिया यांना मुलाखतीदरम्यान साहाला धमकावल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. म्हणजे पुढील दोन वर्षे मजुमदार बीसीसीआय किंवा संलग्न कोणत्याही राज्य मंडळाच्या स्टेडियममध्ये प्रवेश करू शकणार नाहीत किंवा त्यांना बोर्डाकडून मीडिया मान्यताही दिली जाणार नाही.
BCCI bans Boria Majumdar: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पत्रकार बोरिया मजुमदार (Boria Majumdar) यांना क्रिकेटपटू रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याला धमकावल्याप्रकरणी दोषी आढळल्याने दोन वर्षांची बंदी घातली आहे. मुलाखतीसाठी नकार दिल्याबद्दल मजुमदार यांनी साहावर कठोर शब्दांत टीका केली होती. फेब्रुवारीमध्ये, साहाने एका पत्रकार सोबतच्या चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला होता, ज्यामध्ये मजुमदारने त्याला कसे धमकावले होते ते दाखवले होते. “मी अपमान सहन करत नाही. आणि मी हे लक्षात ठेवीन.” मात्र, त्यावेळी साहा यांनी पत्रकाराचे नाव उघड केले नव्हते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement