IND vs BAN 2nd Test 2022 Day 1: बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याच घेतला निर्णय, पहा प्लेइंग 11
टीम इंडियाला आता दुसरा सामना जिंकून मालिका क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. भारतीय संघाचाही हा वर्षातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जात असलेल्या मालिकेत भारतीय संघाने पहिला सामना जिंकून 1-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला आता दुसरा सामना जिंकून मालिका क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. भारतीय संघाचाही हा वर्षातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे, त्यामुळे त्याचा शेवट विजयाने करायचा आहे. दरम्यान बांगलादेशने नाणेफेक जिंकुन फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघानेही एका बदलासह या सामन्यात प्रवेश केला आहे. कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने मागच्या सामन्यात चेंडू आणि बॅटने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)