IPL Auction 2025 Live

Bangladesh Beat India Asia Cup 2023: रोमहर्षक सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाचा 6 धावांनी केला पराभव, शुभमन गिलचे शतक व्यर्थ

या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला.

टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने भारताचा सहा धावांनी पराभव केला. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राउंड-4 च्या शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले होते. नाणेफेक हारल्यानंतर बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 265 धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार शकीब अल हसनने सर्वाधिक 80 धावा केल्या. टीम इंडियाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 266 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी निघालेल्या टीम इंडियाची खराब सुरुवात झाली एकीकडे सगळे बाद होत असताना शुभमन गिलने एकाकी झुंज ठेवली आणि दमदार शतक ठोकले. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)