Pat Cummins Mother Dies: अहमदाबाद कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी, पॅट कमिन्सच्या आईचे निधन; काळी पट्टी बांधून ऑस्ट्रेलियन संघ उतरला मैदानात

मारिया कमिन्स दीर्घकाळ आजारी होती. आईच्या आजारपणामुळे पॅट कमिन्स बॉर्डर गावस्कर मालिकेतील दोन कसोटी सामने खेळून सिडनीला परतला. तेव्हापासून भारताविरुद्धच्या मालिकेत स्टीव्ह स्मिथ कर्णधाराची भूमिका बजावत होता.

Pat Cummins (Photo Credit - Twitter)

Pat Cummins' Mother Maria Passes Away: ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सवर दु:खाचा डोंगर आहे. पॅट कमिन्सची (Pat Cummins) आई मारिया कमिन्स (Maria Cummins) यांचे निधन झाले आहे. मारिया कमिन्स दीर्घकाळ आजारी होती. आईच्या आजारपणामुळे पॅट कमिन्स बॉर्डर गावस्कर मालिकेतील दोन कसोटी सामने खेळून सिडनीला परतला. तेव्हापासून भारताविरुद्धच्या मालिकेत स्टीव्ह स्मिथ कर्णधाराची भूमिका बजावत होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या आईच्या निधनाची माहिती दिली आहे. कमिन्सच्या आईच्या स्मरणार्थ ऑस्ट्रेलियन संघ शुक्रवारी हाताला काळी पट्टी बांधून खेळणार आहे.

पहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now