Babar Azam Trolled: मुलतान कसोटीच्या दुसऱ्या डावात बाबर आझम पुन्हा फ्लॉप, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी डिवचलं

बाबर आझम कसोटी फॉरमॅटमध्ये सातत्याने संघर्ष करत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मुलतानच्या सपाट खेळपट्टीवर दोन्ही संघांनी सहज धावा केल्या, पण बाबर आझमला आपली छाप सोडता आली नाही.

Babar Azam (Photo Credit - X)

PAK vs ENG 1st Test Multan: बाबर आझमचा (Babar Azam) कसोटी फॉरमॅटमधील फ्लॉप शो अव्याहतपणे सुरू आहे. आता मुलतान कसोटीच्या दुसऱ्या डावात बाबर आझम अवघ्या 5 धावा करून बाहेर पडला. बाबर आझमने पहिल्या डावात 30 धावा केल्या होत्या. बाबर आझम दुसऱ्या डावात नक्कीच मोठी धावसंख्या उभारेल, अशी आशा पाकिस्तानच्या चाहत्यांना होती, मात्र त्यांची पुन्हा निराशा झाली. बाबर आझम कसोटी फॉरमॅटमध्ये सातत्याने संघर्ष करत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मुलतानच्या सपाट खेळपट्टीवर दोन्ही संघांनी सहज धावा केल्या, पण बाबर आझमला आपली छाप सोडता आली नाही. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात इंग्लंडने 823 धावा केल्या. बाबर आझम हा सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत असतो. पाकिस्तानी चाहते सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement