Australia's Squad for the IND ODI Series: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, 'हे' तीन खेळाडू परतले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कांगारूंचा संघ जाहीर केला आहे. यात स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलसह कर्णधार पॅट कमिन्सचे पुनरागमन झाले आहे.

IND vs AUS

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी 22 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कांगारूंचा संघ जाहीर केला आहे. यात स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलसह कर्णधार पॅट कमिन्सचे पुनरागमन झाले आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ मेगा स्पर्धेच्या तयारीची चाचपणी करण्याच्या उद्देशाने या मालिकेत प्रवेश करेल. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स 2023 च्या ऍशेसच्या शेवटच्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत भाग घेऊ शकला नाही. याशिवाय स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हे देखील दुखापतींमुळे या मालिकेत सहभागी होऊ शकले नाहीत. आता हे तिन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त पुनरागमन करत आहेत.

पहा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now