IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरणार आहे. भारतीय संघाकडून ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह संघाचा भाग नसल्याची बातमी आहे. उमेश यादवला संधी मिळाली आहे, तर हर्षल पटेलनेही पुनरागमन केले आहे. फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. कर्णधार रोहितने नाणेफेक दरम्यान सांगितले की, बुमराह या सामन्यात खेळत नाही, परंतु पुढील दोन सामने खेळेल.
भारताची प्लेइंग इलेव्हन
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल आणि उमेश यादव